शहर

खंडाळा घाटात एसटी बसला शॉर्टसर्किटमुळे आग; चालक-वाहकाच्या सतर्कतेने 50 ते 60 प्रवाशांचे प्राण वाचले


महागावप्रतिनिधी संजय नागरगोजे
वाशिम आगाराची पुसद–अकोला मार्गावरील एसटी बस खंडाळा घाटातून जात असताना अचानक शॉर्टसर्किट झाल्याने बसने पेट घेतला. बसमध्ये सुमारे 50 ते 60 प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्याचे लक्षात येताच चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना तातडीने बसमधून सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी व प्रवाशांना मदत करण्यासाठी सहकार्य केले. सर्व प्रवासी सुखरूप असल्याने मोठा अनर्थ टळला.
या घटनेबाबत बोलताना संबंधित डेपो व्यवस्थापकांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना सांगितले की, बसला नेमक्या कोणत्या तांत्रिक कारणामुळे आग लागली याची सखोल चौकशी करण्यात येणार असून, दोष आढळल्यास आवश्यक ती दुरुस्ती व उपाययोजना करण्यात येतील.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या मार्गांवर बस सोडण्यापूर्वी वाहनांची सखोल फिटनेस तपासणी व तांत्रिक पाहणी करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button