महागाव तालुक्यात तापाची साथ? तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
सेनंद गावात खळबळ; आरोग्य विभागाची धाव, पाणी व रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : तालुक्यातील सेनंद येथे ताप व उलट्यांच्या त्रासानंतर तीन वर्षीय बालकाचा अचानक मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. रुद्राक्ष राहुल पवार असे मृत बालकाचे नाव असल्याची माहिती आहे. दरम्यान, गावात मोठ्या प्रमाणावर नागरिकांना तापाची लक्षणे जाणवत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी ही घटना समोर आल्यानंतर आरोग्य विभागाचे पथक सेनंद गावात दाखल झाले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावातील परिस्थितीची पाहणी करत पाण्याचे नमुने तसेच नागरिकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सध्या गावातील सुमारे ७० टक्के नागरिकांना तापाची लक्षणे जाणवत आहेत. अनेकांना ताप, अशक्तपणा तसेच उलट्यांचा त्रास होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तीन वर्षीय रुद्राक्षला ताप व उलट्यांचा त्रास झाल्यानंतर अचानक प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला. मात्र, बालकाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी वैद्यकीय तपासणी व आवश्यक अहवाल महत्त्वाचे ठरणार आहेत.
दरम्यान, आरोग्य विभागाने परिस्थितीची गंभीर दखल घेत गावातील पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू केली आहे. पाण्याचे व रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच तापाच्या साथीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी याबाबत अधिकृत माहिती व प्रतिक्रिया देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गावात तापाची साथ पसरली असल्याचा ग्रामस्थांचा दावा असल्याने आरोग्य विभागाच्या अहवालाकडे आता संपूर्ण सेनंद गावाचे लक्ष लागले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



