Uncategorized

करंजखेड येथे नाली तुंबल्याने पिण्याच्या पाण्याला धोका; तातडीने उपाययोजनेची मागणी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात करंजखेड – येथील जुन्या गावातील फिल्टरजवळील नाली तुंबल्यामुळे गंभीर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नालीतील साचलेले घाण पाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
तसेच, सिमेंट पाइप बसवण्यात आल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या गंभीर समस्येबाबत ॲड. भांगे यांनी ग्रामपंचायत सचिवांकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रारीची दखल घेऊन सचिव व सरपंच यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गावातील नागरिकांनीही प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता त्वरित कार्यवाही करून स्वच्छता व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button