Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
शहर

हिमायतनगरच्या ‘पीएम श्री हायस्कूल’ भिंतीला लागून साचले कचऱ्याचे साम्राज्य; वर्गात पसरली तीव्र दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव, नगरसेविका प्रतिनिधींच्या दुर्लक्षावर मुख्याधिकारी (CEO) लक्ष केंद्रित करणार का? शेख अखिल यांचा कडक प्रश्न!


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
भारताच्या संविधानाने कलम २१ अंतर्गत प्रत्येक बालकाला निरोगी व स्वच्छ वातावरणात जगण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. देशात एकीकडे ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या गप्पा मारल्या जातात; मात्र श्रीमंतांच्या घरासमोर स्वच्छता राखणारे प्रशासन गरीब व कष्टकरी वस्तीत मात्र सर्रास कचरा साचवून ठेवते, असा भेदभाव का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. ‘पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल हिमायतनगर’ या शिक्षण मंदिराच्या अगदी भिंतीला लागून साचलेला कचरा व दूषित पाण्यामुळे वर्गात तीव्र दुर्गंधी पसरत असून डासांचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे गरीब विद्यार्थ्यांच्या संविधानात्मक हक्कांवर गदा येत असून त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा दूषित वातावरणात मुलांनी अभ्यासावर लक्ष तरी कसे केंद्रित करावे, असा उद्विग्न प्रश्न विचारला जात आहे.
नगर पंचायतीची निवडणूक होऊन १० महिने उलटले तरी वॉर्ड क्रमांक ३ मधील गरिबांचा हा प्रश्न कायम आहे, असा घणाघाती आरोप वॉर्ड क्रमांक ३ चे नागरिक शेख अखिल यांनी केला आहे. स्थानिक नगरसेविका प्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याने, त्याचा थेट फटका लहान विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सहन करावा लागत आहे. नगरसेविका प्रतिनिधींच्या या निष्काळजीपणानंतर प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्याधिकारी (CEO) तरी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष केंद्रित करून शाळा परिसरातील कचरा हटवणार का, असा कडक प्रश्न शेख अखिल यांनी उपस्थित केला आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button