गरजू महिलेसाठी मदतीचा हात – सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षा धनश्रीताई बिचेवार यांची निस्वार्थ सेवा

प्रवीण इंगळे
उमरखेड तालुका प्रतिनिधी मो.7798767266
विडुळ (ता. _) : दिनांक 10/04/2026 रोजी गावात आयोजित शासकीय कॅम्पमध्ये एका गरजू व अत्यंत गरीब महिलेसाठी मोठा दिलासा देणारी घटना घडली. या कॅम्पमध्ये तहसीलदारांच्या उपस्थितीत संबंधित महिलेला अंतोदय राशन कार्ड प्रदान करण्यात आले.
या महिलेला पतीच्या निधनानंतर अत्यंत कठीण परिस्थितीत संसार चालवावा लागत आहे. लहान-लहान मुलांची जबाबदारी सांभाळत ती शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. तिची ही बिकट परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षा धनश्रीताई बिचेवार यांनी निस्वार्थ भावनेने पुढाकार घेत संबंधित शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे या महिलेला अंतोदय राशन कार्ड मंजूर झाले. कॅम्पमध्ये तहसीलदारांच्या हस्ते कार्डाचे वितरण करण्यात आले, यामुळे या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
धनश्रीताई बिचेवार यांची गरजूंविषयी असलेली तळमळ आणि निस्वार्थ सेवा भावना यामुळे समाजात सकारात्मक संदेश जात असून, अशा कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
चौकटीत…
“गरजूंना मदत करणे हीच खरी माणुसकी आहे…
माझ्याकडून शक्य असेल तितकं मी समाजासाठी काम करत राहणार आहे.
धनश्री बिच्चेवार
सामाजिक कार्यकर्त्या तथा, शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्ष



