शहर

दत्त शिखर संस्थान माहुरगडचे ३०वे महंत मधुसुदन भारती यांचे निधन

वार्ताहर

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र माहुर गड येथील श्री दत्तात्रय संस्थानचे महंत श्री मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती यांचे आज शनिवार(दिनांक ४एप्रिल ) रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान निधन झाले.
भगवान दत्तात्रयांचे जन्मठिकाण असलेल्या श्री दत्त शिखरचे ३०वे महंत१००८ श्री.श्री. मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती यांचे शनिवार (दि.४एप्रिल ) रोजी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटाला वयाच्या ९२व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असुन त्यांना समाधी देण्याचा कार्यक्रम उद्या रविवार (दि.५एप्रिल) रोजी दुपारी तीन वाजता संस्थानच्या नियमाप्रमाणे श्री दत्त मंदिर परिसरात करण्यात येणार आहे.
मधुसूदन भारती महाराज हे दिनांक १४ मार्च १९७८ रोजी रथ सप्तमीच्या शुभ मुहूर्तावर महंत म्हणुन संस्थानच्या गादीवर विराजमान झाले.तब्बल ४०वर्षे त्यांनी महंत म्हणुन याठिकाणी कारभार सांभाळला. संस्थानच्या विकास व भाविकांच्या सोई साठी त्यांनी केलेले कार्य फार मोलाचे आहे.
त्यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त केल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button