Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

सुकन्या लॉजवर पोलिसांचा धडक छापा; कथित देहविक्रय प्रकरणाचा पर्दाफाश!
महागाव शहरात खळबळ; लॉज चालकासह संबंधित महिलांवर PITA Act अंतर्गत गुन्हा


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव शहरातील ओम हरी लॉजच्या वरील मजल्यावर असलेल्या सुकन्या लॉजमध्ये कथित देहविक्रयाचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर महागाव पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांनी सापळा रचून लॉजवर छापा टाकला. या कारवाईत संबंधित महिलांसह लॉज चालक सुनील भिकाजी गव्हाणे यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, लॉजमध्ये बाहेरून महिलांना बोलावून कथित देहविक्रयासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा आरोप आहे. तसेच ग्राहक उपलब्ध करून देणे आणि या व्यवहारात मध्यस्थी करून आर्थिक मोबदला स्वीकारला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली.
महिला पंचांच्या उपस्थितीत छापा
महागाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान महिला पंचांच्या उपस्थितीत लॉजची तपासणी करण्यात आली. संबंधित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर लॉज चालकाविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत सपोनि सुनील अंबुरे, सपोनि प्रसेंजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस उपनिरीक्षक किशोर मुरकुटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल वसीम, हेड कॉन्स्टेबल केशव चव्हाण, हेड कॉन्स्टेबल येडतकर यांच्यासह महागाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि महिला पंच सहभागी होते.
PITA Act अंतर्गत गुन्हा
या प्रकरणात पोलिसांनी PITA Act मधील कलम 3, 4, 5, 5(1)(क) व 9 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केल्याची माहिती आहे.
लॉज चालकाने महिलांना कथित देहविक्रयासाठी लॉज उपलब्ध करून दिल्याचा तसेच या व्यवहारात मध्यस्थी केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत.
महागाव शहराच्या मध्यवर्ती भागातच अशा प्रकारची कारवाई झाल्याने लॉज व्यवसायाबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील कथित अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button