Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

कातरवाडी-काटखेड्यात कोरड्या दुष्काळाची दाहकता; शेतकऱ्यांचा सात दिवसांचा अल्टिमेटम
नदी-नाले कोरडे; जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर — राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील कातरवाडी तसेच पुसद तालुक्यातील काटखेडा परिसरातील शेतशिवारात कोरड्या दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र पाहणीदरम्यान समोर आले. 22 सप्टेंबर रोजी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसह परिसराची पाहणी केली. नदी-नाले कोरडे पडले असून काटखेडा येथील ऋषीबाबा तलावात जनावरांना पिण्यासाठी घोटभरही पाणी उपलब्ध नसल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले.
पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि चाऱ्याचा निर्माण झालेला प्रश्न यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक व मानसिक तणावाखाली असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. “गुरे-जनावरे पाण्याविना जगवायची कशी?” असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
सात दिवसांत दुष्काळ जाहीर करा
या पार्श्वभूमीवर सोमवारी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन परिसरात कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच या परिस्थितीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येणार आहे.
सात दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरून आपल्या न्याय, हक्क आणि अधिकारासाठी आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
“नैराश्यातून आत्महत्या करण्यापेक्षा लढा देऊ”
यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना, “नैराश्यात येऊन आत्महत्या करण्यापेक्षा आपल्या हक्कासाठी लढा देऊ,” असा निर्धार व्यक्त केला. परिस्थिती गंभीर झाल्यास पुसद बंदची हाक देण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.
शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आणि व्यवहारावर बाजारपेठेची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि बाजारपेठेशी संबंधित घटकांनीही शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या लढ्यात सहभागी व्हावे, यासाठी त्यांना निवेदन देऊन सहकार्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे शेतकरी नेते मनीष जाधव यांनी सांगितले.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button