नागरिकांनो अफवांवर विश्वास ठेऊ नका नायब तहसीलदार अमोल महाजन यांचे आवाहन

सहसंपादक शेख मुजाहिद
अमेरिका इस्नायल विरुद्ध इराण युद्धाच्या परिणामांती पेट्रोल डिझेलची भिषण टंचाई निर्माण झाल्याने पेट्रोल पंप बंद होणार आहेत, अशी अफवा उमरखेड शहरात व तालुक्यात सर्वत्र वाऱ्यासारखी पसरत्त्यामुळे पेट्रोल पंपावर दूरवर रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. वाहनधारकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नायव तहसीलदार, तथा निरीक्षण अधिकारी अमोल महाजन यांनी केले आहे.
प्रत्येक वाहनधारक
आपली पेट्रोल डिझेलची व्यवस्था लाऊन ठेवण्यात मन असून पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे पेट्रोलपंपधारकांची व तेथील कर्मचा-यांची धांदल उडत असून शासनाच्या आवाहनापेक्षा अफवांमुळे बाहनधारक प्रभावीत झाल्याचे दिसून येत असले तरीही तालुक्यात कुठेही इंधन तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
वाहनधारकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये इंथन पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवून गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. अमोल महाजन, नायब तहसिलदार तथा निरीक्षण अधिकारी पुरवठा उमरखेड
- कंपनीकडून पुरवठा सुरळीत आहे. मात्र अफवांना बळी पडून भावनीक होऊन नागरिक अकारण गर्दी करीत आहे. – कृष्णा पाटील देवसरकर, संचालक देवसरकर पेट्रोल पंप उमरखेड



