Uncategorized

अमानपुर येथील श्री जगदंबा माता, श्री संत सेवालाल महाराज व श्री रामराव महाराज या मंदिराचा लवकरच होणार जीर्णोद्धार

एस पी दळवी

   उमरखेड तालुक्यातील अमानपूर हे एक बंजारा समाजाची वस्ती असणारे छोटेसे गाव (तांडा) या तांड्यातील मंदिराचे जिर्णोद्धार करण्याचे कार्य लवकर सुरू होणार आहे. 
   याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार अमानपूर येथे प्रमाणिकपणे काबाडकष्ट करून इमानदारीचे जीवन जगणारे ईश्वरावर आढळ श्रद्धा असणारे बंजारा समाज बांधवांचे वास्तव्य आहे तांड्यातील अनेक मुले देशाच्या संरक्षणासाठी सैन्य दलात पोलीस दलात इतर कार्यालयात सेवा बजावत आहेत त्याचप्रमाणे गावातले वातावरण बघितले असता अत्यंत आनंदाने एकमेकांना सहकार्य करणारे जीव लावणारे प्राणीमात्रावर दया करणारे ईश्वराची भक्ती करणारे नागरिक येथे दिसून आले. या गावातील श्री जगदंबा माता, श्री संत सेवालाल महाराज, श्री रामराव महाराज यांचे आज रोजी जे छोटे छोटे मंदिर आहे त्या ठिकाणी कोणत्याही शासकीय निधीची वर्गणीची  मागणी न करता गावकऱ्यांनी आपल्या काबाडकष्टातून उदरनिर्वाह भागवून पदरमोड करून जमा केलेल्या पैशातून वरील मंदिराचा जिर्णोद्धार करून भव्य मंदिर निर्माण करण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने गावातील नायक, कारभारी, पुजारी आणि समस्त गावकरी यांनी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरविले असून आपण कष्टातून जमा केलेल्या पैशाचा विनियोग उत्तम प्रकारे व्हावा त्यामुळे मंदिराचे बांधकाम चांगल्या व्यक्तीच्या हाताने व्हावे या उद्देशाने चर्चा करून जय हनुमान मंदिर मूर्ती कन्स्ट्रक्शन नांदेडचे नावलौकिक असणारे शिल्पकार अरुण गुलाबराव राठोड यांना मंदिराच्या जीर्णोद्धाराची व त्यामागील असलेल्या गावकऱ्यांच्या तळमळीची रूपरेषा सांगितली शिल्पकार राठोड बंधू यांनी  अत्यंत माफक दरामध्ये सदर मंदिराचे जिर्णोद्धराचे काम उत्कृष्ट दर्जाचे करून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे गावकऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे काही कालावधीतच अमानपूर येथील मंदिराचे जिर्णोद्धाराचे अमानुपूरवासीयांनी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे यामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे अशी माहिती आमचे प्रतिनिधी पत्रकार सुरेंद्रनाथ दळवी यांच्याशी  बोलताना गावकऱ्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button