Uncategorized
अवकाळी पावसाचा फटका; कोंदरी-वाकानमध्ये गहू-हरभऱ्याचे नुकसान

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे कोंदरी व वाकान परिसरातील गहू व हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके वाऱ्याने आडवी झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला.
परिसरात वाघाच्या भीतीचे वातावरण असून काही शेतकरी शेतात जाण्यासही घाबरत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत व पीकविमा नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.



