Uncategorized

ई-KYC पूर्ण असूनही लाभापासून वंचित; शेतकऱ्यांची तक्रार, चौकशीची मागणी


महागाव,प्रतिनिधी संजय नागरगोजे

: महागाव तालुक्यात शासकीय योजनांच्या लाभासाठी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत लाभार्थ्यांनी लेखी तक्रार करून प्रशासनाचे लक्ष वेधले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार काही लाभार्थ्यांचे ई-KYC पूर्ण असतानाही त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. उलट काही ठिकाणी ई-KYC न झालेल्या लाभार्थ्यांनाही लाभ दिला जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत अनियमितता होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.
याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा आणि गैरप्रकार उघडकीस यावेत यासाठी या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळे शेतकरी व लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी खरेदी-विक्री संघाचे संचालक रावसाहेब पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button