Uncategorized

जिल्हा परिषद शाळा बेलखेड येथे सांस्कृतिक व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सहसंपादक शेख मुजाहिद

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बेलखेड येथे सांस्कृतिक व स्नेहसंमेलन कार्यक्रम आज दिनांक 27 जानेवारी रोजी अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदी व शिस्तबद्ध वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा. विजय बेतेवाड साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास कुपटी केंद्र प्रमुख विजय मुंगे सर,सुकली केंद्राचे केंद्रप्रमुख विजय इंगोले सर, मारलेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख संजय देशमुख सर, तरोडा केंद्राचे केंद्रप्रमुख आनंद देशमुख सर, देवकते सर तसेच नुकतीच पीएच.डी. पदवी प्राप्त केलेले शिक्षक तय्यब शेख सर मान्यवर म्हणून उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाट्य व विविध कला सादरीकरणातून आपली सुप्त कला सादर केली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांची मने जिंकली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ व दानशूर व्यक्तींचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेच्या सुरक्षा भिंतीसाठी दोन फूट जागा श्री. नागेश वाळूकर यांनी उपलब्ध करून दिली, तर अत्यंत माफक दरात मंडपाची सुविधा श्री. लखन राठोड यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाची सुसूत्र रूपरेषा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल जाधव, शिक्षण तज्ञ अंकुश वाळूकर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक सखाराम पाटील सर व मार्कड सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशामध्ये शाळेच्या शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांचेही मोलाचे योगदान लाभले.
या सांस्कृतिक व स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून शाळा व समाज यांच्यातील सहकार्याचे सुंदर चित्र दिसून आले असून शाळेच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा व चालना मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button