शहर

हदगाव मध्ये पत्रकारांचा भव्य सत्कार; आमदार बाबूराव कदम यांच्या हस्ते ‘दर्पण दिन’ सोहळासंपन्न


​हिमायत नगर (प्रतिनिधी शेख खयुम खूरेशी)

: दि. २७ जानेवारी
​लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा गौरव करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांच्या कार्याला दाद देण्यासाठी, हदगाव-हिमायत नगरचे लोकप्रिय आमदार मा. बाबूराव जी कदम (कोहलीकर) यांच्या वतीने ‘पत्रकार दर्पण दिना’निमित्त भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
​या कार्यक्रमात हिमायत नगर ग्रामीण क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार शेख मुजम्मिल यांचा आमदार महोदयांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकारांशी संवाद साधताना आमदार कदम म्हणाले की, “जनसामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत.”
​या सोहळ्यास माजी नगरसेवक अनवर खानसाब, मसुद खान, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष मुख्तार खान,श्री विकास पाटील देवसरकर, श्री ज्ञानेश्वर पुत्तेवाड, संतोष पाटील गौरव (खडकीकर), माजी नगरसेवक दिलीप ढोणे, श्री सातव यांच्यासह शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत असून, पत्रकार संघाने आमदार महोदयांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button