संस्कार पोद्दार लर्न स्कूलच्या क्रीडा शिक्षक सचिन शिंदे चे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुयश

एस पी दळवी
उमरखेड : येथे आयोजित भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६ मोठ्या उत्साहात पार पडली. यवतमाळ जिल्हा बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन व सोनुभाऊ सोनटक्के मित्र मंडळ यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा जिल्हा समन्वयक (यवतमाळ-पुसद) श्री. नितीन भाऊ भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.
या स्पर्धेत संस्कार पोद्दार लर्न स्कूल, उमरखेड येथील क्रीडा शिक्षक सचिन शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत ६० किलोवरील गटात तृतीय क्रमांक पटकावला. तसेच त्यांच्या आकर्षक शरीरयष्टी व उत्कृष्ट सादरीकरणामुळे त्यांना “उदयोनमुख खेळाडू – उमरखेड शहर औदुंबर श्री” हा मानाचा किताबही प्रदान करण्यात आला.
सचिन शिंदे हे आरोग्य व फिटनेसविषयी अत्यंत समर्पित असून ते नियमित जिममध्ये व्यायाम करतात. ते उत्तम सायकलिस्ट असून मजबूत स्नायूंमुळे त्यांची शरीरयष्टी प्रभावी आहे. तसेच ते कराटे ब्लॅक बेल्ट धारक व कराटे चॅम्पियन असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मानले जातात.
सचिन शिंदे यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



