धनज येथे मोफत महा आरोग्य शिबिर जनसेवा हीच ईश्वर सेवा साहेबराव कांबळे

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड तालुक्यातील धनज येथे विभागाचे लोकनेते स्वर्गीय डॉ.दशरथरावजी वानखेडे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ व जनतेच्या हितार्थ राहुल वानखेडे जयपाल सिंग मुंडा बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आले
शिबिराचे उद्घाटन श्री साहेबरावजी कांबळे साहेब सरचिटणीस काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन केले तो रिबीन कापून शिबिराचे उद्घाटन केले व आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा परमेश्वराच्या नंतर डॉक्टर्स हे जीव वाचवणारे परमेश्वर आहेत असे म्हणून सर्व डॉक्टरांचे साहेबराव कांबळे यांनी आभार मानले व आरोग्य शिबिराला सुरुवात झाली .शिबिरामध्ये नेत्र रोग तपासणी करण्यात आली,

पोटविकार,जनरल तपासण्या मोफत करण्यात आल्या व औषध उपचार मोफत करण्यात आले.शिबिराला डॉ.प्रफुल वानखेडे,डॉ.मंगेश सुरोशे,नागेश कदम(नेत्र चिकित्सक),व स्पंदन ब्लड बँक मार्फत विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आले,शिबिराचा लाभ २७९ रुग्णांनी व १४६ विद्यार्थ्यांनी घेतला.या शिबिराचे नीयोजन राहुल दशरथराव वानखेडे आणि जयपालशिंग मुंडा सेवाभावी संस्था धनज यांनी केले होते. शिबिर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धनज येथे ठेवण्यात आले

त्या प्रसंगी गावातील मा.सरपंच हनवंतराव भडंगे, मा.सरपंच चरण डोंगरे, मा.सरपंच दत्तप्रसाद जाधव,सोसायटी अध्यक्ष मा.सरपंच प्रकाश आमले पत्रकार ज्ञानेश्वर राठोड,सरपंच देवानंद पाचपुते,शाळा समिती अध्यक्ष अशोकराव गुहाडे,ॲड. मजहर देशमुख, ग्रा.प.सदस्य कानिफनाथ गुहाडे,तंटामुक्ती अध्यक्ष राघोजी गायकवाड . फिरोज खान ,विनोद राठोड, जगदेवराव व्यवहारे, नामदेव बोंबले,तातेराव भडंगे,अमोल जोगदंडे,जगदेवराव व्यवहारे,गजानन राठोड,डॉ. नामदेव महाजन ,आशिष डोगंरे, दुर्गेश वाळले,विठ्ठल ठाकरे,शाळेचे मुख्याध्यापक राजेश जोशी व शिक्षक वृंद आणि जयपालसिंग मुंडा बहुउद्देशीय संस्था धनजचे पदाधिकारी

कैलास ग्यानबा बोंबले अध्यक्ष, सुरेश देमाजी गुव्हाडे उपाध्यक्ष , जयराम नागेश्वर कऱ्हाळे सचिव, व सदस्य हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जोगदंडे यांनी केले.



