Uncategorized

शिवाजी विद्यालय पोफाळी येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सहविचार सभा संपन्न


उमरखेड
विद्यार्थ्यांची सुरक्षा व सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय आहे. याच अनुषंगाने श्री शिवाजी विद्यालय, पोफाळी येथे शाळा व्यवस्थापन समिती, परिवहन समिती व इतर विविध समित्यांची संयुक्त ‘सहविचार सभा’ मोठ्या उत्साहात पार पडली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी रमेशराव चव्हाण हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश शेबडे, शिक्षण विस्तार अधिकारी चंदा ढोणे, केंद्रप्रमुख आनंद देशमुख, गणेश शिलार, सतीश नाईक, ॲड. डोळस, विजय बरडे, एस. टी. सूर्यवंशी, बाबू भाई, रविता लकडे, रवी शिलार, मुख्याध्यापक अवधूत देवसरकर आणि सुरेश सुरोशे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक अवधूत देवसरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेत कार्यरत असलेल्या शाळा व्यवस्थापन समिती, परिवहन समिती, विशाखा समिती, आणि पोषण आहार समिती यांच्या कामकाजाबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांचा प्रवास, शाळेतील वातावरण आणि आरोग्यविषयक सुरक्षेबाबत शाळा प्रशासन कशा प्रकारे खबरदारी घेत आहे, याचा पट त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.

पोलीस प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ठाणेदार निलेश शेवडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना सुरक्षेच्या विविध नियमांबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी रस्ता सुरक्षा, तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कसे सतर्क राहावे, याविषयी अत्यंत प्रभावी प्रबोधन केले.

“विद्यार्थ्यांची सुरक्षा ही केवळ शाळेचीच नाही, तर समाज आणि प्रशासनाचीही संयुक्त जबाबदारी आहे.”

या सभेचे सूत्रसंचालन प्रवीण सूर्यवंशी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने केले, तर उपस्थितांचे आभार माणिकराव कांबळे यांनी मानले. या सहविचार सभेला शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोबत फोटो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button