Uncategorized

ऊस तोडीसाठी शेतकऱ्यांकडून वसुली? महागाव तालुक्यात संताप


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून मशीनद्वारे ऊस तोडणी करताना मोठ्या प्रमाणात वसुली झाल्याचा आरोप पुढे आला आहे. ज्या-ज्या शेतात हार्वेस्टर मशीनने ऊस कापणी झाली, त्या मशीनधारकांनी एकरी दोन हजार रुपये, तर ट्रॅक्टर चालकांनी प्रति ट्रिप पाचशे रुपये शेतकऱ्यांकडून घेतल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सवना येथील नॅचरल शुगर फॅक्टरी चे मालक ठोंबरे (कृषिभूषण) यांनी “शेतकऱ्यांनी ऊस तोडीसाठी पैसे देऊ नयेत” असे पूर्वी स्पष्ट केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र प्रत्यक्षात मशीनधारकांकडून वसुली सुरूच राहिल्याने संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कारखान्याकडून टनाप्रमाणे तोडणीचे पैसे मशीनधारकांना दिले जात असताना, अडचणीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांकडून अतिरिक्त रक्कम उकळण्यात आली. महागाव तालुक्यात ज्या प्रमाणात ऊस काढणी झाली, त्यानुसार हेक्टरी सुमारे पाच हजार रुपये वसूल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी शेतकरी उत्पादकांनी साखर आयुक्तालय तसेच मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र यांच्याकडे लेखी तक्रार केल्याची माहिती मिळाली आहे.
शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की—
कारखानदारांनी या तक्रारीची चौकशी करून वसूल रक्कम परत देणार का?
मशीनधारकांवर कारवाई होणार का?
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना होणार का?
“वारंवार शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असताना कोणाचीही सहानुभूती दिसत नाही,” अशी भावना ऊस उत्पादकांनी व्यक्त केली आहे. आता साखर आयुक्तालय व संबंधित कारखाना व्यवस्थापन याकडे लक्ष देऊन न्याय देतात का, कृषी भूषण मालक नॅचरल (शुगर फॅक्टरी) सवना गुंज लक्ष देतील का ऊस उत्पादक शेतकऱ्याची समस्या ज्यामुळे शासनाने एवढे मोठे पद दिले त्यांनी याकडे कोणती भूमिका घेतली याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button