शहर

जिया खान हिचा पहिला रोजा पूर्ण; फुलसावंगी परिसरात कौतुक


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पवित्र रमजान महिन्याची सुरुवात मोठ्या भक्तीभावाने झाली असून महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील पत्रकार शेरखान पठाण यांच्या आठ वर्षीय कन्या जिया खान (जिया पठाण) हिने आपला पहिला रोजा यशस्वीरित्या पूर्ण केला.
रमजान महिना मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत उपवास (रोजा) ठेवला जातो. नमाज पठण, कुराण वाचन, दानधर्म आणि गरजूंची मदत याला विशेष महत्त्व असते.
जियाने श्रद्धा व उत्साहाने पहिला रोजा ठेवत कुटुंबीयांसोबत नमाज अदा केली. तिच्या या धार्मिक भावना, चिकाटी आणि शिस्तीचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. लहान वयातच धार्मिक संस्कारांची जोपासना केल्याबद्दल कुटुंबीयांनाही शुभेच्छा दिल्या जात आहेत.
रमजान महिन्याच्या या पवित्र वातावरणात जियाचा पहिला रोजा हा तिच्यासाठी आणि कुटुंबासाठी विशेष आनंदाचा क्षण ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button