ढ़ानकी येथे शिवजयंती निमित्त मुस्लिम मावळ्यांनी केले शिवरायांना अभिवादन.

सहसंपादक शेख मुजाहिद
बहुजन प्रतिपालक कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही आज जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींकडून साजरी केल्या जाते.
अठरापगड जाती धर्मातील मावळ्यांना एकत्र करून रयतेच्या स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज, ढाणकी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील शिवस्मारकास जयंतीनिमित्त पुष्पाहार अर्पण अठरापगड जाती धर्मातील मावळ्यांनी अभिवादन केले.
दरम्यान राष्ट्रिय मुस्लीम मोर्चा हा सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष शेख जब्बार भाई तथा भारत मुक्ती मोर्चा चे अमोल पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मुस्लिम मावळ्यांनी अभिवादन करीत जयंती साजरी केली.
“छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा विचार आज घरा घरात रुजवून शिवरायांच्या स्वप्नातील,संविधानातील अंतर्भूत असलेली लोकशाही स्वरूपातील शिवशाही पुनर्स्थापित करणे ही प्रत्येक मावळ्यांची जबाबदारी आहे.”
असे प्रतिपादन शेख जब्बार यांनी यावेळी केले.
यावेळी अभिवादन करताना भारत मुक्ती मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश कांबळे,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे मुनव्वर खान,अमीन भाई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चिकाटे,पत्रकार शेख इरफानभाई,शाहरुख भाई,लहुजी क्रांती मोर्चा तालुकाध्यक्ष दिलीप कलाले,विक्रम प्रेमिलवाड,
यांसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
अठरापगड जाती धर्मातील मावळ्यांनी एकत्र येऊन साजरी केलेली ही शिवजयंती सर्वत्र आदर्शवत ठरून हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरत आहे.



