Uncategorized

कुरळी येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या


कुरळी प्रतिनिधी :

उमरखेड (कुरळी)तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या कुरळी येथील शेतकरी संदीप अंशीराम आढागळे वय 37 वर्ष यांनी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये दिनांक 02/02/ 2026 रोजी शेतीवरील कर्ज व सततची नापिकी या कारणामुळे सकाळी साडे दहा वाजता शेतातील फवारणी करण्यासाठी आणलेले विषारी द्रव्य प्राशन केले ही बाब मोठ्या भावाच्या लक्षात येताच त्यांनी संदीप यांना यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु आज दिनांक 18/2 /2026 रोजी सायंकाळी चार वाजता उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला कर्जबाजारी शेतकरी संदीप यांच्या पश्चात विधवा आई एक अविवाहित बहीण पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा बराच मोठा परिवार आहे आपल्या7 एकर शेतीवर असणाऱल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अडीच लाख रुपये कर्जामुळे संदीप हा नेहमीच चिंतेत असायचा
त्याचबरोबर यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान झाले त्याचबरोबर शेतीचे सुद्धा खूप नुकसान झाले शेती पण खरडून गेली त्यामुळे तो अधिकच चिंतेत राहू लागला परिणामी संदीप यांनी आपला जीव कर्जबाजाराला कंटाळून गमावला
तरी या भागातील वाढती शेतकरी आत्महत्या लक्षात घेता शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत करून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता परिसरातील नागरिकाकडून जोर धरत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button