महागाव तालुक्यात साई (ई)गांजासह आरोपी ताब्यात

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील काळी दौलत खान ते साई इजारा रोडवर गांजाची वाहतूक करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक इसम दुचाकीवरून गांजाची वाहतूक करीत असल्याचे समजले होते. त्यानुसार सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून सुमारे 6 किलो 272 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 1 लाख 65 हजार 440 रुपये इतकी आहे. संबंधित दुचाकी (क्रमांक MH 29 N 2877) देखील जप्त करण्यात आली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुनील दादाराव आगोसे (वय 32, रा. हिवळणी) असे आहे.
या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NPdS Act 1985) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सतीश चावरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा पुसद ही कारवाई करीत आहे.
यापूर्वीही या भागात मोठ्या प्रमाणात गांजाची शेती आढळून आली होती. शेतात व जंगल परिसरात गांजाची लागवड केल्याचे प्रकार समोर येत असून पोलिसांकडून वेळोवेळी धाडी टाकून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे गांजा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



