शहर

हिमायतनगरच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरला जाणारा दिवस: नगराध्यक्षांचा ‘भगीरथ’ संकल्प सिद्धीस!

​
​हिमायतनगर ( ता़ प्रतिनिधी शेख खयुम खूरेशी ): “जोपर्यंत मी या खुर्चीवर आहे, तोपर्यंत माझ्या हिमायतनगरमधील एकाही माता-भगिनीला पाण्यासाठी हंडा घेऊन उन्हात वणवण करण्याची वेळ येऊ देणार नाही,” हा नगराध्यक्षांचा शब्द आज सत्यात उतरला आहे. नगराध्यक्षांच्या धडाकेबाज नियोजनामुळे वार्ड क्रमांक ४, १५ आणि १६ मधील वर्षानुवर्षांचा पाणीप्रश्न कायमचा निकाली निघाला असून, या भागात घेतलेल्या बोअरवेलला ‘गंगेसारखे’ भरघोस पाणी लागले आहे.
​महिलांच्या डोळ्यातील आनंदाश्रू अन् नगराध्यक्षांचे कर्तृत्व:
शहरातील वाढती लोकसंख्या आणि उन्हाळ्याची चाहूल लक्षात घेता, नगराध्यक्षांनी स्वतः मैदानात उतरून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते. आज जेव्हा या तिन्ही प्रभागांत बोअरवेलचे काम यशस्वी झाले आणि जमिनीतून पाण्याचा प्रवाह उसळला, तेव्हा उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केला. “आम्हाला दिलेला शब्द नगराध्यक्षांनी केवळ पाळलाच नाही, तर करून दाखवला,” अशा भावना येथील महिलांनी व्यक्त केल्या आहेत.
​विकासाचा नवा अध्याय:
केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष कृतीतून विकास कसा साधता येतो, याचे उत्तम उदाहरण नगराध्यक्षांनी शहरासमोर ठेवले आहे. वार्ड ४, १५ आणि १६ आता ‘पाणीटंचाईमुक्त’ झाले असून, घराघरात शुद्ध पाणी पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगराध्यक्षांच्या या ऐतिहासिक कार्याचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत असून, हिमायतनगरच्या विकासाचा हा नवा अध्याय मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button