उमरखेड नगर परिषदेत कर वसुलीतील अतिरिक्त व्याजाच्या रक्कमेत कपात करण्याची मागणी

मुख्य संपादक
उमरखेड, 9 फेब्रुवारी – उमरखेड नगर परिषदेच्या भाजप गट नेते प्रशांत उर्फ विजय कृपासागर हरडफकर यांनी मुख्याधिकारी नगर परिषद उमरखेड यांना पत्र लिहून कर वसुलीतील अतिरिक्त व्याजाच्या रक्कमेत कपात करण्याची मागणी केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, सन 2025-26 च्या कराच्या रक्कमेत 24 टक्के वाढ केली असून ती भरमासाठ वाढ झालेली आहे. तसेच चालू वर्षाच्या करर वसुलीवर देखील जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्याच्या करावर देखील व्याज आकारणी केल्या जात आहे. सदरील वाढ ही शासनाच्या आदेशानुसार असेल तरीही आपण आपल्या अखत्यारीत असणाऱ्या सामान्य जनतेला दिलासा देणे महत्वाचे असून सदरील व्याज पद्धतीत सर्वानुमते बदल करणे गरजेचे आहे.
हरडफकर यांनी मागणी केली आहे की, सदरील व्याज आकारणी मध्ये लोकांना कशा पद्धतीने सवलत देता येईल. याचा विचार करून सदरील विषय नगराध्यक्ष तथा नगरसेवक यांच्या समोर ठेवून येणाऱ्या सर्वसाधारण सभेत यावर दिलासादायक निर्णय घ्यावा.
या पत्राने उमरखेड नगर परिषदेतील कर वसुलीतील अतिरिक्त व्याजाच्या रक्कमेत कपात करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळू शकेल.



