लेवा येथे विद्युत डीपी जळून खाक; शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील लेवा येथे विद्युत वितरण कंपनीचा डीपी (ट्रान्सफॉर्मर) शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी घडली. या घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी बंद पडल्या आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, उन्हाळा किंवा पावसाळा नसतानाही डीपी जळाल्याने एमएसईडीसीएल (महावितरण) अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वायरिंगमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे डीपीला आग लागल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे.
वीजपुरवठा बंद पडल्यामुळे शेतीसाठी पाणीपुरवठा ठप्प झाला असून शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळ नवीन डीपी बसवून वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे केली आहे.



