Uncategorized

बहुजन मुक्ती पार्टी च्या पाठपुराव्याला यश.अपघातात मृत झालेल्या टेंभुर्दरा येथील विद्यार्थ्याच्या कुटुंबाला मिळाला न्याय!

सहसंपादक शेख मुजाहिद

मागील वर्षी 25 जानेवारी 2025 रोजी टेंभुर्दरा येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी विश्वनाथ दादाराव ब्रम्हटेके हा उमरखेड कडे प्रवास करत असताना झालेल्या अपघातात उपचारादरम्यान नांदेड येथे अकास्मिक अपघाती मृत्यू झाला.यांनतर कुटुंबावर प्रचंड मोठी शोककळा पसरली.12 वी मध्ये जिल्ह्यातून प्रथम येणारा,प्राथमिक ते उच्च शिक्षनापर्यंत प्राविण्य प्राप्त करणारा,आयएएस अधिकारी बनल्यावर घरची अठरावीश्वे दरिद्री संपेल अशी अनेक स्वप्न उराशी घेऊन जगणाऱ्या आई वडिलांवर,आपला एक अतिशय हुशार मुलगा गमावल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला.यातून कुटुंबावर प्रचंड कर्ज आणि मानसिक ताण आलेला होता. अशातच बहुजन मुक्ती पार्टी चे उमरखेड तालुक्यातील युवा नेतृत्व विद्वान केवटे यांच्याकडे सदर मृत विद्यार्थ्यांच्या मोठ्या भावाने संपर्क घेऊन ह्या प्रकरणी शासनाकडून आर्थिक सहाय्यरुपी न्याय मिळवून देण्यासाठी सांगितले.ही माहिती मिळताच सतत च्या पाठपुरावा आणि संघर्षातून दोन दिवसांपूर्वी पीडित कुटुंबाला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून 2 लाख रुपयांचा सहायता निधी प्राप्त करून दिला. यानंतर त्यांनी आज ह्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि “यापुढे देखील गोर गरीब सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव सोबत राहू या प्रकरणी आम्ही उमरखेड कृषी विभागाचे देखील आभार व्यक्त करतो.”अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. यावेळी लहुजी क्रांती मोर्चा चे दिलीप कलाले,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शेख जब्बारभाई,बहुजन मुक्ती पार्टी चे अमोल पाटील,प्रकाश कांबळे,कृष्णा चंद्रवंशी, पत्रकार मिलिंद चिकाटे, यांसह मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे कुटुंबीय आई अनिता दादाराव ब्रम्हटेके,शंकर ब्रह्मटेके, दादाराव ब्रम्हटेके,तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. चौकट: अत्यंत हुशार असलेला आणि यूपीएससी ची तयारी करणारा माझा भाऊ अचानक अपघातात मृत पावल्यानंतर आमचे कुटुंब आर्थिक,मानसिक रित्या खचलेले होते.अशात बहुजन मुक्ती पार्टीचे विद्वान भाऊ केवटे यांनी सतत पाठपुरावा करून आम्हाला हा न्याय मिळवून दिला. याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.- शंकर ब्रह्मटके – (मृत विद्यार्थ्याचे भाऊ टेंभुर्दरा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button