Uncategorized

ढाणकी–मेट जंगल परिसरात अवैध मुरूम उत्खनन बिनधास्त; वनविभागाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
उमरखेड तालुक्यातील ढाणकी ते मेट जंगल विभागात अवैध मुरूम उत्खनन खुलेआम सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. या परिसरातील जंगलातील टेकड्या जेसीबीच्या साह्याने पूर्णपणे खोदून मोठ्या प्रमाणात मुरूम काढला जात असून, त्याची वाहतूक बिनधास्तपणे सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित वनाधिकाऱ्यांच्या संगनमताने मुरूमाची अवैध वाहतूक ढाणकी व बिटरगाव परिसरात सुरू आहे. दिवसाढवळ्या जेसीबीद्वारे खोदकाम व वाहतूक होत असतानाही वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.
जंगल क्षेत्रातील नैसर्गिक टेकड्या सपाट होत असल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून, वन्यजीवांच्या अधिवासालाही धोका निर्माण झाला आहे. अवैध उत्खनन सुरू असताना अधिकारी गप्प का आहेत? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून अवैध मुरूम उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button