राष्ट्रिय गुरूरविदास क्रांती मोर्चा व राष्ट्रिय मुस्लिम मोर्चा द्वारे ढानकी येथे संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

सहसंपादक शेख मुजाहिद
मध्ययुगीन भारतातील महान संत ज्यांनी समाजातील अनिष्ट रुढी परंपरांना संपवून समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय प्रस्थापित करण्याचे महान कार्य केले.असे महान संत शिरोमणी गुरुरविदास महाराज यांचा जन्मोत्सव भारत आणि भारताबाहेरही मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो.
आज दि.1 फेब्रुवारी 2026 रोजी ढानकी शहरात
संत गुरु रविदासजी महाराज यांच्या जयंती निमित्त बामसेफ प्रणित गुरु रविदास क्रांती मोर्चा तथा राष्ट्रिय मुस्लीम मोर्चा द्वारे विविध सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन वैचारिक प्रबोधनात्मक अभिवादन केले.
यावेळी
“संत गुरु रविदास महाराज यांचा विचार हा मानवतेच्या उद्धाराचा विचार असून, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपला,’ अस्पृश्य मूळचे कोण?’ हा ग्रंथ त्यांना अर्पण करून दिल्लीत पहिली जयंती साजरी केली होती.” असे विचार भारत मुक्ती मोर्चा चे दिलीप कलाले यांनी व्यक्त केले.
तसेच वैचारिक अभिवादन करताना बहुजन मुक्ती पार्टी चे मुनव्वर खान यांनी,”संत रविदास महाराजांची जयंती अठरापगड जाती धर्मातील बांधवांनी एकत्र येऊन वैचारिक प्रबोधनातून साजरी करावी असे मत व्यक्त केले.”
भारतीय युवा मोर्चाचे अमोल पाटील, राष्ट्रिय मुस्लीम मोर्चा चे शेख जब्बारभाई यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ पत्रकार शेख इरफान भाई,मिलिंद चिकाटे,शाहरूख भाई हे होते.
यावेळी संत रविदास महाराज चौक ढानकी येथील संत रविदास महाराज स्मारक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी मोठ्या उत्साहात अभिवादन करीत जयंती साजरी केली.



