Uncategorized

मुडाणा येथे तुळजापूर–नागपूर रोडवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तरुणाचा हात गमावला


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
तुळजापूर–नागपूर मार्गावरील मुडाणा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ज्ञानेश्वर खंडू फोले हा तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचा एक हात गमवावा लागल्याची माहिती आहे.
ही घटना दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या मार्गावर भरधाव वाहने व अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून, अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने वेगमर्यादा, वाहतूक नियंत्रण व सुरक्षिततेच्या उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button