
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त करून शेतकऱ्यांसाठी मोकळे करून देण्यात प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप करत एकता पत्रकार संघाच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याबाबत प्रशिक्षण अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
पांदण रस्ते मोकळे करण्याबाबत शासनाचे परिपत्रक असतानाही महागाव तालुक्यात अनेक पांदण रस्त्यांचे प्रश्न अद्याप कायम असल्याचे संघाचे म्हणणे आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी तसेच महसूल मंत्र्यांकडे निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
अवैध गौणखनिज उत्खननावर कारवाईची मागणी
तालुक्यात विविध ठिकाणी गौणखनिजाचे कथित अवैध उत्खनन झाल्याच्या तक्रारी असून, यासाठी जबाबदार व्यक्ती निश्चित करून शासनाचा रॉयल्टी व दंड वसूल करावा, तसेच संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करून दोष आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय भोगवर्धन वर्ग-२ जमिनींचे नियमबाह्य पद्धतीने वर्ग-१ मध्ये रूपांतर, शासनाची रॉयल्टी न भरता करण्यात आलेल्या व्यवहारांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महागाव नगरपंचायत हद्दीत तहसीलदारांकडून अधिकार नसताना करण्यात आलेल्या कथित एनए (नॉन-अॅग्रिकल्चर) आदेशांची तपासणी करून नियमबाह्य आदेश असल्यास ते रद्द करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पांदण रस्ते, अवैध गौणखनिज उत्खनन, जमीन वर्गीकरण व एनए प्रकरणांबाबत प्रशासनाने ठोस कारवाई करावी, या मागणीसाठी ३० सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा एकता पत्रकार संघाने दिला आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



