Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorizedमहागाव

३० वर्षांनंतर सरपंचपद एसटीसाठी राखीव झाल्याने वाद; जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : तालुक्यातील नाईकनगर ग्रामपंचायतीचे सरपंचपद तब्बल ३० वर्षांनंतर अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव झाल्याच्या पार्श्वभूमीवर वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात गैरअर्जदारांनी संजय दौलत राठोड व उदल महादू पवार घरी येऊन जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत मोतीराम महादू मुकाडे यांनी २४ सप्टेंबर रोजी महागाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, अर्जदार मोतीराम महादू मुकाडे हे नाईकनगर येथील रहिवासी असून, त्यांच्या कुटुंबाचे नाव मागील अनेक वर्षांपासून गावातील मतदार यादीत आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण एसटी प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर मतदार यादीतील नावावरून संबंधितांकडून वाद निर्माण करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या वादातून गैरअर्जदारांनी आपसात संगनमत करून मतदार यादीतील नाव कमी करण्याबाबत दबाव आणला तसेच घरी येऊन जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मोतीराम मुकाडे यांनी महागाव पोलिसांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. तक्रारीतील आरोपांची पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतरच त्यातील तथ्य स्पष्ट होणार आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button