Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

महागाव तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र; शासनाच्या योजनांचा लाभ मिळतोय तरी कुठे?
पुन्हा हिवरा येथे शेतकऱ्याचा मृत्यू; वाघनाथ, घाणमुख, दहिसावळीतील घटनांनी चिंता वाढली


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. हिवरा येथील विष्णू नामक शेतकरी २२ सप्टेंबर रोजी ‘शेतात जातो’ असे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र दोन दिवस त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर २४ सप्टेंबर रोजी कलगाव शिवारातील भवांकर यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी, पिकांचे नुकसान, पावसाची अनिश्चितता आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर अशा घटना घडत असल्याचे चित्र आहे. शासनाकडून विविध योजना जाहीर केल्या जात असल्या तरी त्यांचा लाभ प्रत्यक्ष गरजू शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचतो का, असा प्रश्न या घटनांमुळे उपस्थित होत आहे.
यापूर्वी वाघनाथ, घाणमुख आणि दहिसावळी परिसरातही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आत्महत्यांमागील कारणांचा प्रशासनाने गांभीर्याने तपास करून संबंधित कुटुंबांना शासनाच्या मदतीचा लाभ वेळेत मिळतो आहे की नाही, याची पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतीचा वाढता खर्च, पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणी यामुळे शेतकरी संकटात आहे. पीकविमा, नुकसानभरपाई, कर्जसवलत आणि अन्य शासकीय योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना तातडीने मिळणे आवश्यक आहे.
शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबवण्यासाठी प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार? शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असलेल्या योजना प्रत्यक्षात किती पोहोचल्या? याची आता प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button