Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

महागावच्या दुष्काळी परिस्थितीवर २८ सप्टेंबरला किसान सभेचा मोर्चा
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत, पीकविमा व कर्जवसुलीला स्थगितीची मागणी


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व DYFI तालुका कमिटीच्या वतीने डी.बी. नाईक यांच्या नेतृत्वात २८ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर किसान मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पिके वाचविण्यासाठी तातडीने मदत करण्याची गरज असून दुष्काळाचा परिणाम शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांवर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची तातडीने पाहणी करून दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, मागील व चालू वर्षाचा पीकविमा तातडीने मंजूर करावा, गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, तसेच जलजीवन मिशनची अपूर्ण कामे पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतरस्ते व पांदण रस्त्यांना योजनेंतर्गत मंजुरी देऊन कामे सुरू करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
पीककर्ज वाटपाची मुदत वाढविण्याची मागणी
शेतकऱ्यांच्या कर्जप्रश्नाकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे. पीककर्ज वाटपाची मुदत वाढवावी, बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे आणि कर्जवसुलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांच्या घरी अथवा शेतावर जाऊन वसुली करू नये, अशी मागणीही करण्यात आली.
या विविध मागण्यांसाठी २८ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर किसान मोर्चा काढण्यात येणार असून प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी देविदास मोहकर, शरद डोंगरे,पांडुरंग मुढे, दत्तराव खंदारे, गणेश तीगलवार, दिलीप भिसे, बाळासाहेब रणमले, प्रकाश ढगे, दयाराम जाधव, विठ्ठल घावस, कैलास राठोड, मुरलीधर पवार, विनोद आडे, दीपक देशमुख, रमेश जाधव, शेख इसाक, खलनाईक पवार, सुनील पवार, योगाजी रणमले, अरविंद मोहन राठोड, सचिन जाधव, रघुनाथ नरवाडे, विजय पवार, अवधूत राजने यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button