पंचायत समिती उमरखेड तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या नारळी ग्रामपंचायतला दिनांक 30 /01 /2026 वार शुक्रवार ला श्री. किरण कोळपे

नारळी :- ग्रामपंचायत इयत्ता भेट दिली गटविकास अधिकारी यांनी भेट दिली. प्रधान मंत्री आवास टप्पा दोन योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्याचे घरकुलाचा पहिला हप्ता पडला आहे. अध्यापही घराचे बांधकाम चालू केले नाही. अशा लाभार्थ्यांना सूचना दिल्या. नारळी गावचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच रोजगार सेवक आणि सदस्य यांनी घरकुल लाभार्थ्यांना भेट देऊन बांधकाम चालू करण्याचे सांगायचे आहे.आणि त्यांच्याकडून आठ दिवसांमध्ये घरकुल बांधकामाला सुरुवात करून घ्यायचे आहे. असे स्पष्ट सूचना दिले आहेत. नारळी गावामध्ये ज्या लाभार्थ्याचा घरकुलाचा पहिला हप्ता पडला आहे. आणि त्यांनी बांधकाम चालू केलं नाही. आशा लाभार्थ्यांना स्वतः गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन त्यांना बांधकाम चालू करण्याचे सांगितले आहे. जोपर्यंत जुन्या घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. नारळी ग्रामपंचायत ला तोपर्यंत नवीन घरकुल येणार नाही. यामुळे गावाच्या विकास थांबला नसला पाहिजे. त्याकरिता घरकुल लाभार्थ्यांनी लवकरात लवकर घराचे बांधकाम सुरू करून परिपूर्ण करून घ्यावेत. यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मंदा पत्की साहेब यांच्या संकल्पनेखाली येणाऱ्या एक मे या महाराष्ट्र दिना दिवशी नारळी येथील घरकुल लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम पूर्ण करून गृहप्रवेश करून घ्यावा असे उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी घरकुल लाभार्थ्यांना आव्हान केले. यावेळी नारळी गावचे ग्रामसेवक श्री.अनिल गाडेकर साहेब सरपंच श्री. संजय मुकिंदा बर्डे, उपसरपंच श्री.बीबीचंद राठोड, घरकुल इंजिनियर श्री. निखिल वानखेडे ग्रामपंचायत सदस्य श्री. दिलीप आडे, श्री. बबन आडे ग्रामपंचायत कर्मचारी श्री. साहेबराव बर्डे, श्री रवी राठोड, संगणक चालक गणेश राठोड माजी सरपंच श्री.मनोज जाधव, रोजगार सेवक श्री. किसन जाधव माजी सदस्य पी एम जाधव, प्रतिष्ठित नागरिक श्री. रामा मेडके व गजानन गाताडे यांच्या सह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.



