Uncategorized

शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; धोकादायक वाहनातून वाहतूक – कारवाईची मागणी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील ग्रामीण भागात काळी दौलत खान परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक धोकादायक पद्धतीने होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून याकडे शाळा व्यवस्थापन समितीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
काळी दौलत, वाकान, कोणदरी, साईजारा, घोणसरा, चिचपाड व वनोली या परिसरात विद्यार्थ्यांची अवैध व असुरक्षित वाहनातून वाहतूक होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. अशा वाहनांमधून प्रवास करताना कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
जर एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल नागरिक व पालक उपस्थित करत आहेत. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणे ही मोठी शोकांतिका असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
नागरिकांनी व पालकांनी अशा वाहनांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून, शाळा प्रशासन व संबंधित यंत्रणांनी तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button