ध्वजारोहण करताना शाळेचे अध्यक्ष पंजाबराव खडकेकर यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील पोखरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठ्या उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष पंजाबराव खडकेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी स्वर्गीय रामभाऊ कोसलगे कनिष्ठ महाविद्यालयातही प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रंगोळी स्पर्धा, देशभक्तीपर कार्यक्रम व सांस्कृतिक सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी प्रमुख पाहुणे, उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



