शहर

शेतकऱ्यांचा विश्वासघात करून पॉवर मेक प्रोजेक्ट लिमिटेड ने काढला पळता पाय

विश्वासघात ग्रस्त शेतकऱ्यांचे मा. उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय समोर आमरण उपोषण

उमरखेड
प्रतिनिधी
PMPL RSVCPL JV पॉवर मेक प्रोजेक्ट लिमिटेड हैदराबाद या कंपनीने मुळावा येथील रहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांची विश्वासघात करून काढता पाय घेतला असल्यामुळे न्याय मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी ९ मार्च २०२६ रोजी मा. उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, मुळावा येथील रहिवासी शेतकरी १) शहाजी गंगाराम खडसे,२) भागोराव गंगाराम खडसे, ३) सुदाम गंगाराम खडसे या तिघा वयोवृद्ध भावांची मौजा हातला शिवारातील शेत सर्वे नंबर ६५ क्षेत्रफळ ४ हे ८६ आर या शेतजमिनीतून वरीलउल्लेख केलेल्या कंपनीने मुरूम (खडक) रेल्वे रस्त्याचे कामाकरिता उत्खनन करून नेण्याचा आणि त्या ऐवजी सदर शेतामध्ये २.५ ते ३ फुट काळी माती टाकून देण्याचा लेखी करारनामा करून दिला, करारनाम्याप्रमाणे कंपनीने सदर शेतातून मुरूम खडक नेला परंतु करारानुसार सदर शेत जमिनीमध्ये काळी माती टाकून देण्याचे टाळून काम अर्धवट सोडून दिनांक १८/०२/२०२६ चे मध्यरात्री कामावरची मशीन इत्यादी साहित्य घेऊन पळून गेला याबाबतीत मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, मा. ठाणेदार पोलीस स्टेशन पोफाळी तसेच महाराष्ट्र राज्याचे वि. मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिले असून अध्याप पर्यंत आमच्यावर झालेल्या विश्वासघाताची साधी चौकशी सुद्धा झाली नसल्याने न्याय मिळण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे. राष्ट्राच्या विकास कार्यात मदत करणाऱ्या वर होणाऱ्या अन्यायाला अधिकारी वाचा फोडतील का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button