Uncategorized

अभा ग्राहक पंचायत व पतंजली योग समितीतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा भव्य सत्कार

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड:-
पतंजली योग समिती व अभा ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा स्थानिक विरंगुळा केंद्र येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. दिनेशजी राठोड (प्रांताध्यक्ष, पतंजली योग समिती – पूर्व विभाग) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार किसनराव वानखेडे, जनशक्ती आघाडी प्रमुख ॲड. संतोष जैन, भारत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष विलासराव देवसरकर, नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. तेजश्री संतोष जैन, तालुका पतंजली योग समितीचे यशवंत गिरी, अभा ग्राहक पंचायतचे अध्यक्ष प्रा. प्रकाश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. स्वागत गीतानंतर प्रा. प्रकाश देशमुख यांनी प्रास्ताविकात ग्राहक पंचायतचे कार्य, ग्राहकांचे अधिकार व ग्राहक संरक्षण कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. विलासराव देवसरकर यांनी योगाचे महत्त्व सांगून नियमित योगसाधनेचे आवाहन केले.
यावेळी नगराध्यक्षा सौ. तेजश्री जैन यांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व पतंजली नामांकित शेला देऊन सत्कार करण्यात आला. सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व स्वीकृत सदस्य ॲड. बाळासाहेब नाईक, गोपाल अग्रवाल व प्रा. विजय गुजरे यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच जेष्ठ शिक्षक डी.एम. जाधव, प्रा. व्ही.ना. कदम व जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर तंवर यांचा विशेष सत्कार झाला.
सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्षा तेजश्री जैन यांनी उमरखेडच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आमदार किसनराव वानखेडे यांनी शहर व तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली तसेच प्रत्येक प्रभागात योगकेंद्र स्थापन करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. विनय चव्हाण यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा. अमोल कवाने यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होऊन अल्पोपहारानंतर कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button