शहरशैक्षणिक

संस्कार पोद्दार लर्न स्कूल उमरखेड येथे ‘संस्कारम 2026’ मध्ये घडले भारतीय कला संस्कृतीचे दर्शन

एस पी दळवी
उमरखेड

उमरखेड येथील संस्कार पोद्दार लर्न स्कूल येथे आयोजित वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘संस्कारम २०२६’ निमित्त महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यमंत्री श्री. इंद्रनील नाईक यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त झाला.

माननीय श्री. इंद्रनील नाईक हे पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून सध्या महाराष्ट्र शासनामध्ये राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये तसेच शिक्षकवृंदामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माननीय राज्यमंत्री श्री. इंद्रनील नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणासोबतच कला, संस्कार आणि मूल्याधिष्ठित शिक्षण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘संस्कारम २०२६’ या उपक्रमास त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत शाळेच्या संस्कारप्रधान शैक्षणिक कार्याचे विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्कार पोद्दार लर्न स्कूल उमरखेड व ॲलन (ALLEN) यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ग सहावी ते दहावी फाउंडेशन क्लासेस, IIT-JEE व NEET परीक्षांसाठीच्या वर्गांची उमरखेड येथे अधिकृत सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यवतमाळचे प्राचार्य श्री. प्रफुल चपाटे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आधुनिक शिक्षणासोबत संस्कार आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेश देशमुख, उपाध्यक्ष प्रा. अजय क्षीरसागर, सचिव श्री. निशांत बयास, कोषाध्यक्ष श्री. धीरज बगाडे या सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली प्रिन्सिपल श्री भैरोबा मुंजाळ, प्रशासकीय अधिकारी श्री अतिश दिघेवार यांचे सह शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी पोलीस वाहतूक विभाग, आरोग्य विभाग यांचेही मार्गदर्शन लाभल्याबद्दल संचालक मंडळाचे वतीने त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.


एकूणच ‘संस्कारम २०२६’ हा कार्यक्रम शिक्षण, संस्कार, संस्कृती आणि स्पर्धा परीक्षांच्या दिशेने वाटचाल करणारा एक आदर्श उपक्रम ठरला असून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणाऱ्या आनंदाची झलक बघावयास मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button