१८ जानेवारी रोजी महागाव येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन.

एस पी दळवी
ता. प्र. उमरखेड
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणिजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा व प्रवचन दर्शन सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक : १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी 9 ९:००वाजता महागाव शहरातील क्रीडा संकुल, नवीन पोलीस वसाहतीच्या मागे, आठवडी बाजार समोर, महागाव शहर ,जिल्हा यवतमाळ पश्चिम येथे करण्यात आले आहे अशी माहिती पश्चिम विदर्भ उपपीठ पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे साहेब, पीठ सहप्रमुख संजय खंडागळे साहेब, पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे साहेब यांनी दिली.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी संस्थांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्राम स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, रक्तदान शिबिर ,वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान व अवयव दान ,मोफत रुग्णवाहिका सेवा महाराष्ट्रात विविध महामार्गावर ५३ रुग्णवाहिका २४ तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, मोफत घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत, कायदेविषयक साक्षरता शिबिर ,रक्तदान शिबिर अंतर्गत गेल्या वर्षी जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १३६२७२ रक्तकूपिका महाराष्ट्र शासनाच्या ब्लड बँकेकडे सुपूर्द करण्यात आले होते. जानेवारी २०२६ मध्ये सुद्धा जीवनदान महाकुंभ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रासह अनेक राज्यात रक्तदान शिबिरे चालू आहेत.ब्लड इन नीड, एक पेड मॉं के नाम वृक्षारोपण उपक्रमांतर्गत ऑक्टोबर महिन्यात १११६२४ वृक्षारोपण करण्यात आले. आदी उपक्रम संस्थांमार्फत राबविले जातात.
या कार्यक्रमानिमित्त महागाव शहरातून जगद्गुरुश्रींच्या पादुकांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये विविध देखावे यांचे सादरीकरण होणार आहे. जगद्गुरुश्रींच्या पादुकांचे संतपिठावर आगमन झाल्यानंतर विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यामध्ये गुरु पूजन, उपासक दीक्षा, आरतीसोहळा, जगद्गुरुश्रींचे प्रवचन,प्रवचनकाराचे अमृततुल्य प्रवचन, दर्शन सोहळा, पुष्पवृष्टी असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
तसेच उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सामाजिक उपक्रमांतर्गत समाजातील गरजवंतांना १३ मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी दिवसभर येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या नयनरम्य सोहळ्यासाठी जिल्हा सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, तालुका सेवा समितीचे पदाधिकारी,सेवा केंद्र समितीचे पदाधिकारी , आरती केंद्र समितीचे पदाधिकारी,युवासेना, हिंदू संग्राम सेना, महिला सेना, प्रवचनकार, गुरु सेवक ,प्रोटोकॉल अधिकारी, आजी व माजी पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी जी जिल्ह्यातील जास्तीत जास्त भक्तगण, उपासक, साधक ,शिष्य ,हितचिंतक यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या नयनरम्य सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यवतमाळ पश्चिम जिल्हा निरीक्षक गोविंद उपासे, जिल्हाध्यक्ष गजानन गरवारे, जिल्हा महिलाध्यक्षा सौ.अर्चना चव्हाण, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भारत वानखेडे, महागाव तालुकाध्यक्ष रामदास ठाकरे यांच्यासह,पीठ समितीचे पदाधिकारी, जिल्हा समितीचे पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष,तालुका समितीचे पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.



