Uncategorized

किनवट रोडवर दुचाकी–मालवाहू ऑटोची समोरासमोर धडक; युवक जागीच ठार,


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
शिवाजी मोघे महाविद्यालया समोर मंगळवारी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास मालवाहू ऑटो रिक्षा आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोरच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात दोन शाळकरी विद्यार्थी व रिक्षाचालक जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच. २९ बीडी ३७५८ क्रमांकाची मालवाहू ऑटो रिक्षा फुलसांगीच्या दिशेने येत होती, तर एम.एच. २९ सीएन ६८७२ क्रमांकाची दुचाकी किनवटच्या दिशेने जात होती. शिवाजी मोघे महाविद्यालयासमोर दोन्ही वाहनांची जोरदार समोरासमोर धडक झाली.
या अपघातात दुचाकी चालविणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच रिक्षाचालक आकाश गंगाराम बोईनवार हा जखमी झाला असून, रिक्षामधील शाळकरी विद्यार्थी
सागर हाके (रा. टाकळी)
राहुल दत्ता राठोड (रा. नारळी)
हे दोघेही जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महागाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button