महागाव तालुक्यात पांदन रस्त्यावर अतिक्रमण; तात्काळ कारवाईची मागणी अहवाल वरिष्ठांकडे सादर

महागाव | प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील वनोली खेडी अंतर्गत असलेल्या पांदन रस्त्यावर
सुमारे १५ ते २० नागरिकांनी अनाधिकृत बांधकाम केल्यामुळे
पांदन रस्ता अडचणीत सापडला आहे.
वादग्रस्त जागेवर करण्यात आलेले हे बांधकाम
अनाधिकृत असल्याचे प्रथमदर्शनी
तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केलेल्या
मौका पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहे.
या संदर्भातील अहवाल
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत नकाशावर
महागाव तालुक्यातील सर्व पांदन रस्ते
अधिकृतरित्या दर्शविण्यात आलेले असून,
हे रस्ते वाहतुकीसाठी व दळणवळणाच्या सोयीसाठी मोकळे करणे
आणि आवश्यक तेथे रस्ता विकसित करणे,
अशी शासनाची स्पष्ट भूमिका आहे.
मात्र महागाव तालुक्यात
मोठ्या प्रमाणावर पांदन रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने
आजही अनेक रस्ते
वाहतुकीसाठी मोकळे झालेले नाहीत.
याचा थेट फटका
शेतकरी, ग्रामस्थ तसेच दळणवळण व्यवस्थेला
बसत आहे.
याप्रकरणी
महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून
संपूर्ण महागाव तालुक्यातील
सर्व पांदन रस्त्यांवरील अतिक्रमण
काढून रस्ते मोकळे करावेत,
अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



