Uncategorized

पोहंडूळ येथे बाहेरगावच्या व्यक्तींनी दंगा, छेडछाड व मारहाण नऊ आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल


महागाव | प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील पोहंडूळ गावात बाहेरगावच्या नऊ व्यक्तींनी गावात घुसून दंगा घडवून आणत छेडछाड व मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेत काही नागरिकांना गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी परवीन चिराग अरबी यांनी दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी महागाव पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष हजर राहून लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नऊ आरोपींची नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आली असून, जखमी नागरिकांचे यवतमाळ येथील वैद्यकीय अहवाल (मेडिकल रिपोर्ट) पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत.
तक्रारीची तात्काळ दखल घेत महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पी.आय.) धनराज निळे यांनी घटनास्थळी बीट जमादार पाठवून पंचनामा केला. तसेच परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदवून घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी महागाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक 0001/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 75, 118(1), 296, 189(2), 190, 191(1), 115(2), 352 अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती ठाणेदारांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
तक्रार गंभीर स्वरूपाची असल्याने आरोपींविरुद्ध दंगा, मारहाण, छेडछाड तसेच जखमी करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, अंबोडा येथील काही रहिवासी आरोपी असून, त्यांना पोहंडूळ गावात येण्याचे कोणतेही वैध कारण नव्हते, अशी वस्तुस्थिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.
या घटनेमुळे पोहंडूळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button