Uncategorized

शिक्षकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास आयुष्यात अडचणी येणार नाहीत – आ. राजेंद्र नगरधने


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
स्थानिक सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच नवभारत प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेहसंमेलनाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र नगरधने होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास आयुष्यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.” प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण केले पाहिजे. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्त्व विकास घडतो, असेही त्यांनी नमूद केले.
उद्घाटक म्हणून महागाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सुनंदाताई सुरोशे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांमध्ये विद्यालयाचे व्यवस्थापक संभाजीराव नरवाडे, नवभारत विद्यालयाचे व्यवस्थापक विलासराव नरवाडे, शाळा समिती सदस्य पंजाबराव पवार, सुभाषराव नरवाडे, भगवानराव नरवाडे, तसेच नगरसेवक शैलेश कोपरकर, गजू पाटील, संतोष हुम्बे, साहेबराव सूर्यवंशी, महेंद्र कावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना संभाजीराव नरवाडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे असतात. वक्तृत्व, आत्मविश्वास व आपले विचार मांडण्याचे धैर्य अशा कार्यक्रमांतूनच विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी एकल, दुहेरी व सांघिक संगीत कार्यक्रम सादर केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित नाटिका सादर करून सामाजिक संदेश दिला. या कार्यक्रमाला शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला पालक उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच नवभारत प्राथमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव धात्रक यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीकांत कदम यांनी मानले.
उद्या दिनांक ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषण व प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button