शहर

महागाव प्र. क्र.१ मध्ये देशी दारू दुकानास महिलांचा तीव्र विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत क्षेत्रातील प्रभात क्रमांक १ मध्ये देशी दारूचे दुकान सुरू करण्याच्या हालचालींना महिलांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. आज दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी महिलांनी माजी आमदार भारतीय जनता पार्टीचे ससाने यांच्यासह यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत जिल्हाधिकारी व दारूबंदी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. दुकान सुरू होण्यापूर्वीच बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महिलांनी दिला आहे.
महिलांच्या आरोपानुसार काही भ्रष्ट नगरसेवकांनी जनतेची दिशाभूल करून देशी दारू दुकानासाठी एनओसी दिली आहे. यापूर्वी प्रभात क्रमांक १७ मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे एनओसी देऊन दुकान सुरू करण्यात आले होते. त्याच पद्धतीने प्रभात क्रमांक १ मध्येही नव्याने कागदपत्रे सादर करून दुकान सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रभात क्रमांक १ व १७ मधील महिलांनी देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेतला असून कायद्याने दुकान बंद पाडण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. या मुद्द्यावर आगामी महागाव नगरपंचायत निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
महिलांनी नगरपंचायतमधील काही नगरसेवकांच्या भ्रष्ट कारभारावरही आरोप केले असून बोगस ठराव, फाईल चोरी, घरकुल प्रकरणात अनियमितता याबाबत पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या असूनही अद्याप कोणतेही गुन्हे दाखल झाले नाहीत. तक्रारी असूनही चौकशी न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी व दारूबंदी अधिकारी देशी दारू दुकानाबाबत काय भूमिका घेतात, याकडे महागाववासीयांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व नगरसेविका जयश्री नरवाडे, नगरसेवक सुरेश नरवाडे व अन्य महिलांनी केले असून देशी दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव निवेदनाद्वारे प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button