शहर

हिमायतनगर मुख्य बाजारपेठेत पोलिसांची गस्त; रस्ता मोकळा ठेवण्याचे वाहनधारकांना आवाहन


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): शहरातील मुख्य बाजारपेठ, चौपाटी बाजार आणि पोस्ट ऑफिस परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाहनधारकांनी लावलेल्या अस्ताव्यस्त गाड्यांमुळे नागरिकांना येण्या-जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशान्वये आज हजेरी मेजर नवाबखान युसूफखान पठाण आणि पोलीस कर्मचारी शेख लायक शेख नूर यांनी पोलीस ताफ्यासह बाजारपेठेत प्रत्यक्ष गस्त घालत पाहणी केली.
​या परिसरात रस्त्यांच्या दुतर्फा दुचाकी व इतर वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात असल्याने, तसेच फळ विक्रेते आणि इतर सर्वच व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच दुकाने व हातगाड्या लावल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. या गर्दीचा व अरुंद रस्त्याचा फायदा घेऊन पाकीटमारांकडून नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याचा धोका संभवतो, अशी भीती हजेरी मेजर नवाबखान पठाण यांनी व्यक्त केली. ही समस्या लक्षात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी बाजारपेठेत फिरून रस्त्यावरील वाहने व अडथळे बाजूला करून घेतले आणि रस्ता क्लियर केला.
​यावेळी पोलिसांनी कोणतीही दंडात्मक कारवाई न करता केवळ कडक वार्निंग दिली. बाजारपेठेतील सर्व व्यापारी आणि हातगाडी चालकांनी लोकांना येण्या-जाण्यासाठी पुरेसा रस्ता सोडून, आपापल्या गाड्या आणि दुकानांचे साहित्य आत दाबून (रस्त्याच्या आत बाजूला) लावण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले, जेणेकरून मुख्य रस्त्यावर कोणतीही अड़चण निर्माण होणार नाही आणि गर्दी कमी होईल. तसेच, दुचाकी वाहनधारकांना पुढील वेळेस येत असताना ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बुक अनिवार्यपणे सोबत बाळगण्याची ताकीद देण्यात आली आहे. पुढील वेळी अडचण होणार नाही याची काळजी घेण्यास पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button