शहर

बंदी भागातील रस्ते-पुलांच्या कामांना अखेर गती; आमदारांचा विकासाचा दावा उमरखेड–महागाव मतदारसंघ

| प्रतिनिधी संजय नागरगोजे
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उमरखेड–महागाव मतदारसंघातील बंदी भागातील प्रलंबित रस्ते व पुलांच्या कामांना गती देण्याचा संकल्प आमदार किसनराव वानखेडे यांनी केल्याचे चित्र दिसून येत आहे. उमरखेड येथे पराभवाचा सामना केल्यानंतर उशिरा का होईना, मात्र आमदारांनी मतदारसंघात प्रत्यक्ष दौरे करून विकासाचा भिडा उचलल्यासारखे भासू लागले आहे.
ब्राह्मणगाव–चातारी रस्ता, उमरखेड–विडूळ रस्ता यांसह अनेक प्रमुख मार्गांची दुरवस्था आजवर दुर्लक्षित राहिली. मोठमोठे खड्डे, निकृष्ट दर्जाची कामे आणि ठेकेदारांवरील नियंत्रणाचा अभाव यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. टक्केवारीच्या नादात कामांचा दर्जा ढासळल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे.
या परिसरातील रस्ते व पुलांची कामे अनेक वर्षांपासून रखडलेली असल्याने नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी तसेच इतर ठिकाणी जाण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर या गंभीर समस्येची दखल घेत आमदारांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याचे सांगितले जात आहे.
दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह आमदारांनी बंदी भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रस्ते व पुलांच्या कामांना तात्काळ गती देण्याच्या, उत्कृष्ट दर्जा राखण्याच्या तसेच वनविभागाकडील परवानग्या त्वरित मिळवण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशीही दूरध्वनीद्वारे संवाद साधण्यात आला.
बंदी भागातील रोजगार, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांवर भर देत सर्वांगीण विकास साधण्याचा ठाम निर्णय आमदार किसनराव वानखेडे यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. उशिरा का होईना, मात्र अखेर विकासाकडे वाटचाल सुरू झाल्याचे चित्र सध्या मतदारसंघात दिसून येत आहे. अजून कामाला सुरुवात झाली नाही फक्त पाहणी दौरा झाला आहे वृत्तपत्राच्या बातम्यामुळे हैराण झालेले आमदार कामाच्या शोधात असलेले दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button