शहर

यवतमाळ जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघड शेंदूरसनी गावात २७ हजार बनावट जन्म–मृत्यू नोंदी आढळल्या


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
या प्रकरणाच्या चौकशीसाठी गृह विभागाकडून एसआयटीची स्थापना
यवतमाळ जिल्ह्यातील शेंदूरसनी या गावात तब्बल २७ हजार जन्म व मृत्यूच्या बेकायदेशीर नोंदी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या गावाची मूळ लोकसंख्या अत्यंत कमी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात नोंदी कशा झाल्या, यामुळे संपूर्ण प्रशासन हादरले आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत गृह विभागाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली असून, यासंदर्भात माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. प्राथमिक तपासात जन्म–मृत्यू नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे.
या बेकायदेशीर नोंदी तयार करणाऱ्या संबंधित व्यक्ती किंवा अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तसेच शेंदूरसनीसारख्या प्रकारच्या अनियमित नोंदी इतर गावांमध्येही आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या नोंदींचा वापर ओळखपत्रे, सरकारी योजनांचा लाभ, मतदान, शासकीय कागदपत्रे यासाठी झाला आहे का, याचाही सखोल तपास एसआयटीमार्फत केला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर शेंदूरसनी प्रकरण पुढे कोणत्या वळणावर जाते, याकडे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button