शहर

महागाव येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा धडाकेबाज छापा मोरथ व वेणी येथे कारवाई; ३.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त, ९ जण ताब्यात तर ५ जण फरार


महागाव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव पोलिसांनी अवैध जुगाराविरोधात मोठी कारवाई करत तालुक्यातील मोरथ व वेणी येथील दोन जुगार अड्ड्यांवर एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत ३ लाख ७२ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही संशयित घटनास्थळावरून पसार झाले.
पोलिसांना मोरथ येथे एका ठिकाणी पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान काही जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून ७ हजार ६१० रुपये रोख व ३३ हजार ७०० रुपये किमतीचे पाच मोबाईल असा ४१ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर वेणी येथेही छापा टाकून काही जणांना ताब्यात घेण्यात आले, तर पाच संशयित घटनास्थळावरून फरार झाले. या कारवाईत ६०० रुपये रोख, ५५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल आणि २ लाख ७५ हजार रुपयांची सहा दुचाकी वाहने असा एकूण ३ लाख ३० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही कारवायांमधील एकूण जप्ती ३ लाख ७२ हजार ११० रुपये इतकी असून, संबंधितांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
ही कारवाई महागाव पोलिस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर मुरकुटे व त्यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button