Uncategorized

घरकुल पूर्ण… पण हप्ता नाही! महागाव नगरपंचायतीत लाभार्थ्यांची धडक; बेमुदत उपोषणाचा इशारा


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत हद्दीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे पूर्ण बांधकाम होऊनही शेवटचा हप्ता न मिळाल्याने घरकुल लाभार्थ्यांनी नगरपंचायत कार्यालयात धडक दिली आहे. 31 डिसेंबरपर्यंत हप्त्याची रक्कम खात्यात जमा न झाल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे महागाव नगरपंचायत ला आजपर्यंत कायमस्वरूपी मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाला नाही असे असताना
सन 2018 ते 2025 या कालावधीत अनेक घरकुले पूर्ण झाली आहेत. मात्र घरकुल न बांधणाऱ्या व्यक्तींच्या खात्यात हप्ते जमा झाले, तर प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण करणारे लाभार्थी हप्त्यांपासून वंचित राहिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
यात भर म्हणजे १८ घरकुलांच्या फायली नगरपंचायत कार्यालयातून गहाळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी नगरपंचायतीने महागाव पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे.
हप्ते न मिळाल्याने घरकुल लाभार्थ्यांमध्ये तीव्र संताप पसरला असून, ही चूक, हलगर्जीपणा की थेट गैरव्यवहार? असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button